पुणे : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बारावीत विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुकला औषधनिर्माणशास्त्र, कृषी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेऊन जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

हेही वाचा >>> वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?

Maharashtra ssc board examination
कर्मचाऱ्यांची अदलाबदल, ड्रोनची देखरेख… कॉपी रोखण्यासाठी राज्य मंडळाचे महत्वपूर्ण निर्णय!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
teacher capacity enhancement in pune
दहावी, बारावीच्या ऐन परीक्षा काळात शिक्षकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण
rte admission process loksatta news
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामुळे ‘आरटीई’ प्रवेश सोडतीच्या वेळेत बदल
caste validity certificate submission on April 6 2025
६ एप्रिलपर्यंत जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा ; ‘एसईबीसी’ आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
Guidance for 10th-12th students State Board appoints counsellors
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

मात्र, जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज अद्यापपर्यंत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात दाखल केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रमानुसार विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल न केलेल्या विद्यार्थ्यांनी http://www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून त्याची छापील प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य संजय दाणे यांनी केले.

Story img Loader