पुणे : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बारावीत विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुकला औषधनिर्माणशास्त्र, कृषी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेऊन जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा