लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावरील विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी पीएमपीने विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या सेवेला क्रिकेट शौकिनांचा प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार जादा गाड्या सोडण्याचे नियोजनही वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाच सामने पुण्यातील गहुंजे मैदानावर होणार आहेत. यातील पहिली लढत येत्या १९ ऑक्टोबर रोजी आहे. त्यामुळे पाच सामान्यांसाठी महापालिका भवन, कात्रज आणि निगडी टिळक चौक या तीन स्थानकावरून गहुंजेसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड

पुणे महापालिका भवन, कात्रज बाह्यवळण बसस्थानक, निगडी टिळक चौक येथून १९ आणि ३० ऑक्टोबर तसेच १ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर रोजी गाड्या सोडण्यात येणार आहेत. सकाळी ११, ११.३५, दुपारी १२.०५ आणि १२.३० वाजता गाड्या सुटणार असून, त्यासाठी प्रती व्यक्ती शंभर रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी याच स्थानकावरून सकाळी ८.२५, ८.५० आणि सकाळी ९ वाजता गाड्या सुटणार असल्याची माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली. पीएमपीच्या या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special facility by pmp for world cup cricket match in pune pune print news apk 13 mrj