पुणे : आगामी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा प्रारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे उद्या १९ जून रोजी दुपारी १२.३० वा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते होत आहे. चाकणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला खासदार ॲड.वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आकडेमोडीत व्यग्र, मुंबईत बैठकांचं सत्र!

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता

आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता श्रीमती चाकणकर यांनी ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना काही मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.

हेही वाचा >>> सोलापूर : ‘अग्निपथ’ भरती विरोधात आंदोलनासाठी आलेल्या तरूणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाला, वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करणे, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देणे, स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देणे यासोबतच महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करण्याबाबतही सूचित करण्यात आले होते.

हेही वाचा >>> केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजनेचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा मनसेला आंदोलन उभारावे लागेल – गजानन काळे

या तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने ‘आरोग्यवारी’ या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीत या महत्त्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे, असे मत चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.