पुणे : दीर्घायुष्य मिळावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, पण जीवनात जे काही कमावले त्याचे आपल्यानंतर काय होईल, हेही प्रत्येकानेच वेळ निघून जाण्याआधीच पाहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले साधे-सोपे दस्त म्हणजेच ‘इच्छापत्र’ (विल) करण्यासाठी काय, कसे करता येईल याबद्दल परिपूर्ण माहिती येत्या शनिवारी (८ मार्च) सायंकाळी सर्वांना मिळविता येईल.

१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी गुंतवणूकदारांना सजग आणि सज्ज करणारा विशेषांक ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त योजण्यात आलेल्या या कार्यक्रमात, कुटुंबाच्या सांपत्तिक आरोग्याची काळजी म्हणून आवश्यक असलेल्या ‘वेल्थ चेकअप’ची संधी सर्वांसाठी खुली झाली आहे. शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी ज्याप्रमाणे संतुलित आहार, व्यायाम, वैद्यक तपासणी आवश्यक असते, तशीच काळजी आपण आपल्या खिशाच्या अर्थात सांपत्तिक स्थितीच्या आरोग्याबाबतही घ्यायला हवी. त्यासाठी गरजेच्या असलेल्या ‘वेल्थ चेकअप’द्वारे उपस्थितांना त्यांचे वर्तमान आर्थिक आरोग्यमान नेमके जाणून घेता येईल. शिवाय चांगल्या भविष्याच्या दिशेने वाटचालीत, त्यात सुधारणेसाठी आवश्यक उपायही योजता येतील.

सर्वांसाठी खुल्या आणि विनामूल्य अशा या उपक्रमाचे आयोजन शनिवार, ८ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता पुण्यात करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘इच्छापत्र’ (विल) कोणी करावे, कोणत्या वयात व कसे करावे, तसेच त्या अंगाने सर्व प्रश्न-शंकांचा उलगडा ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि कर सल्लागार दीपक टिकेकर करतील. तर, आपल्या आर्थिक नियोजनात पैसा मोठा करणारे गुंतवणुकीचे मार्ग कोणते आणि ते कसे निवडायचे, याचे उत्तर सनदी लेखाकार व वित्तीय नियोजनकार रेखा धामणकर या कार्यक्रमात देतील. या निमित्ताने सर्वांसाठी ‘गुंतवणूक-संकल्प’ ठरत आलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक विशेषांकाच्या १२ व्या अंकाचे प्रकाशनही होत असून, हा अंकदेखील उपस्थितांना मिळविता येईल.

मुख्य प्रायोजक : आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड
सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड
पॉवर्ड बाय : नेमिनाथ ज्वेलर्स आणि टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड

कार्यक्रमाची माहिती

कधी : शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता
कुठे : श्रेयस बँक्वेट्स हॉल, आपटे रस्ता, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, पुणे</p>

सहभाग : रेखा धामणकर / दीपक टिकेकर

अधिक माहितीसाठी संपर्क : ०२२६७४४०३९०

(म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, सर्व योजनासंबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

महिलांसाठी वित्तीय नियोजनाचे खास मार्गदर्शन

हा कार्यक्रम महिला दिनी होत असून, महिलांनी कशा प्रकारे वित्तीय नियोजन करावे, यावरही यात भर देण्यात येणार आहे. महिला आता कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे त्यांचे आर्थिक नियोजन करीत आहेत. त्यांना हे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल, याबाबत या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

Story img Loader