पुणे : कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ एका भागात झाली नाही. शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य भागात देखील झाली. मात्र, पोलिसांनी जातीय दंगली कशा हाताळायच्या याची माहिती असते. नियमावली प्रमाणेच पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांची कारवाई योग्य होती, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयाेगासमोर केला.

हेही वाचा >>> CISCE Exam: ‘सीआयएससीई’च्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर… कधीपासून परीक्षा होणार सुरू?

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
Contractor fined Rs 1.5 lakh for poor road work in Andheri
अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त न्यायमूर्ती जे. एम. पटेल आणि माजी सचिव सुमीत मलिक यांच्या चौकशी आयोगाची स्थापना केली होती. आयोगासमोर ५३ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आयोगाचे पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम युक्तिवाद दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर चैाकशी आयोगासमोर विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी मंगळवारी अंतिम युक्तिवाद सुरू केला. कोरेगाव भीमा भागात हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली. गंभीर परिस्थिती असताना पेरणे फाटा भागातील जयस्तंभ परिसरात अनुनायी दर्शन घेत होते.

हेही वाचा >>> अकरापैकी एकाच नगरसेवकाला आमदारपद, उर्वरित १० जणांचे स्वप्न निवडणूक हरल्यामुळे भंगले

हजारो अनुनायी तेथे जमले होते. हिंसाचार उसळल्यानंतर त्याचे पडसाद नगर रस्त्यावरील शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भागात उमटले. जाळपोळ करण्यात आली. जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले होते. पोलिसांनी योग्य ती कारवाई करुन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. या भागात चेंगराचेंगरीची घटना घडली नाही, तसेच जिवितहानी झाली नाही. महिला आणि लहान मुलांना सुखरुप सुरक्षितस्थळी पोहचविण्यात आले. अचानक हल्ला झाल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली, असे ॲड. हिरे यांनी युक्तिवादात नमूद केले..या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत (२९ नोव्हेंबर) सुरू राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Story img Loader