पुणे : देशभरातील विद्यार्थ्यांना गुजरातमधील वडनगर येथील प्रेरणा शाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून, राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘प्रेरणा द स्कूल ऑफ एक्सपेरिअन्शिअल लर्निंग’ या कार्यक्रमाअंतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण विभाग व शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

प्रेरणा शाळेत दहा जिल्ह्यातील दोनशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात शंभर मुले आणि शंभर मुली अशा दोनशे विद्यार्थ्यांसाठी एक आठवड्याचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. नोंदणीकृत शंभर मुले, शंभर मुली यांच्यातील निवडक दोनशे विद्यार्थ्यांपैकी छाननी करून पुणे जिल्ह्यातून दहा मुले, दहा मुलींची निवड केली जाणार आहे. त्यातील एका मुलीला व एका मुलाला राज्य पातळीवर पाठवले जाणार आहे.

हेही वाचा : लोणावळ्यातील हॉटेल मॅनेजिंग डायरेक्टरने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग; गुन्हा दाखल

या उपक्रमासाठीची नोंदणी ३ जानेवारीपासूनच सुरू झाली आहे. त्यानुसार राज्यातील ३२ हजार ६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात यवतमाळमधील पाच हजार ७०५, तर पुण्यातील पाच हजार २५२ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्या खालोखाल ठाणे (११०६), नाशिक (१११४), नागपूर (१३७९), अकोला (१७६२), मुंबई (२२०७), वाशिम (२६९२), लातूर (३०६१) अशा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Story img Loader