पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीने रसिकांसाठी २३ एप्रिलपासून महिनाभर शहरभरात विविधांगी व्याख्यानांची मेजवानी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, भारिप नेते प्रकाश आंबेडकर, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आदींचा सहभाग राहणार आहे.
व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे व समन्वयक राजेंद्र धावटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दररोज सायंकाळी सात वाजता ही व्याख्याने होणार आहेत. काळभोरनगरच्या सुबोध व्याख्यानमालेत २३ एप्रिलला गणेश शिंदे यांचे पासवर्ड आनंदाचा, दि. २४- कमल निंबाळकरांचे आजची महिला व  दि. २५ ला डॉ. लक्ष्मण आसबे यांचे उत्तुंग आमची ध्येये या विषयावर व्याख्यान होईल. चिंचवडगाव चापेकर चौकातील जिजाऊ व्याख्यानमालेत दि. २६- विवेक वेलणकर व मानव कांबळे यांची मुलाखत पत्रकार स्वप्नील पोरे घेणार आहेत. दि. २७- माधवी घारपुरे यांचे कथाकथन, दि. २८- अनिल सहस्रबुद्धे-  अस्वस्थ पूर्वाचल, दि. २९- विवेक घळसासी- युवकांची प्रेरणा व स्वामी विवेकानंद व ३० एप्रिलला बाबा जाधव यांचे दोन शब्द आई-बाबांसाठी ही व्याख्याने होतील. प्राधिकरणात सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेत १ मे ला डॉ. श्रीकर परदेशी यांचे पिंपरी-चिंचवड २०३०, २ मे ला देवेंद्र फडणवीस यांचे उद्याचा महाराष्ट्र, ३ मे-  क्रांतिगीता महाबळ यांचे भान समाजमनाचे, ४ मे- अविनाश धर्माधिकारी- स्वामी विवेकानंद, ५ मे- दिनेश थिटे- पाकिस्तानातील हिंदूंची दुरवस्था ही व्याख्याने होणार आहेत. आकुर्डी म्हाळसाकांत चौकातील जयहिंदू व्याख्यानमालेत १० मे- विवेक जोशी- स्वामी विवेकानंद, ११ मे- अपर्णा रामतीर्थकर- आई, १२ मे- डॉ. दीपक साळुंके- निरामय जीवनशैली. १३ मे- बाबासाहेब खराडे- हसण्यासाठी जन्म आपला. १४ मे- मोहन शेटे- धर्मवीर संभाजी महाराज ही व्याख्याने होणार आहेत. मोहननगरच्या लोकमान्य व्याख्यानमालेत १५ मे- ब्रह्मकुमारी नलिनी व ब्रह्मकुमार दशरथ यांचे प्रकृतीत राजयोग १६ मे- जयंत जाधव, मीनल बाठे, गोकुळ पवार, ज्योत्स्ना चांदगुडे यांचे हास्य कविसंमेलन. १७ मे- अविनाश धर्माधिकारी यांचे स्वामी विवेकानंद, १८ मे- बुधाजीराव मुळीक यांचे दुष्काळ या विषयावर, १९ मे- प्रकाश आंबेडकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सुराज्य आणि २० मे- चंद्रशेखर शिखरे- छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी सुहास पोफळे, मारुती भापकर, मनोज वेताळे, सुदाम मोरे, रवी नामदे, प्रभाकर ढोमसे, अजित भालेराव, दत्तात्रय साने, दीपक नलावडे, वसंत इनामदार, ज्ञानोबा जाधव, दीपक शिर्के, प्रदीप गांधलीकर, सुहास पागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 व्याख्यानमालेचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी
टाळगाव चिखली येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केली जाणारी स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला यंदा होणार नाही. व्याख्यानमालेवर होणारा खर्च दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला असल्याची माहिती सुदाम मोरे यांनी या वेळी दिली.