सहा थांबे वगळले; वेळेपेक्षा पाऊन तास आधीच पुणे स्थानकावर पोहोचणार असल्याने प्रवाशांना दिलासा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : पुणे स्थानकावरून रात्री इतर भागात जाणाऱ्या गाडय़ांच्या वेळा जुळविण्याच्या दृष्टीने प्रवाशांची मागणी लक्षात घेता आता दुसरी लोकलही ‘सेमी फास्ट’ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लोणावळ्याहून रात्री ११.४० वाजता सुटणारी लोकल आता वेगवान होऊन पूर्वीच्या वेळेपेक्षा सुमारे पाऊन तास आधीच पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. मात्र, त्यासाठी ही उपनगरीय स्थानकांतील मार्गातील सहा स्थानकांवर थांबणार नाही. यापूर्वी लोणावळ्याहून रात्री १०.३५ वाजता सुटणारी रेल्वेगाडी वेगवान करण्यात आली होती.
रात्री लोणावळा ते पिंपरी- चिंचवड पट्टय़ातून पुणे स्थानकावर येऊन विविध भागांत जाणाऱ्या गाडय़ा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रात्री १०.३५ वाजताची लोकल काही वेळ आधी पुणे स्थानकावर आणण्याबाबत प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार यापूर्वी २ डिसेंबरपासून या लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यापुढेही लोकलचा वेग कायम ठेवण्यात येणार आहे. सध्या ही लोकल लोणावळ्यावरून रात्री १०.३५ वाजता सुटून ही लोकल पुणे स्थानकावर ३० मिनिटे आधी म्हणजे रात्री ११.५० वाजता पोहोचते. त्यामुळे याच कालावधीत पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या इतर गाडय़ांचा लाभ प्रवाशांना घेता येत आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पाहता आता दुसरी लोकलही सेमी फास्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोणावळ्याहून रात्री ११.४० वाजता सुटणारी लोकल २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत प्रायोगित तत्त्वावर सहा स्थानकांवरील थांबा वगळून वेगवान करण्यात येणार आहे. लोणावळ्यातून रात्री ११.४० वाजता सुटून ही गाडी रात्री १२.५० वाजता पुणे स्थानकावर दाखल होईल. यापूर्वी ही गाडी रात्री १. ३५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचत होती. रात्री १२.५० वाजता लोकल पुणे स्थानकावर येणार असल्याने प्रवाशांना सातारा, सांगली, मिरज या भागांत जाण्यासाठी त्याचप्रमाणे पुड्डुचेरी एक्स्प्रेस, तिरुनेलवेली एक्स्प्रेस, शरावती एक्स्प्रेस त्याचप्रमाणे दौंड, सोलापूर, वाडी आदी भागांत जाण्यासाठी हुसैनसागर एक्स्प्रेस उपलब्ध होऊ शकणार आहे. याचा प्रवाशांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
वगळलेल्या स्थानकांवर अत्यल्प प्रवाशी
लोणावळ्याहून पुण्याकडे रात्री ११.४० वाजता येणारी लोकल पुणे स्थानकावर ४५ मिनिटे आधी पोहोचविण्यासाठी तिला वेगवान करण्याबरोबरच मार्गातील सहा थांबे वगळले जाणार आहेत. मळवली, कामशेत, कान्हे, बेगडेवाडी, कासारवाडी आणि खडकी या स्थानकांवर ही लोकल थांबणार नाही. या गाडीमध्ये संबंधित स्थानकावर अत्यल्प प्रवासी असल्याने सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सेमी फास्ट करण्यात आलेल्या लोकलच्या मार्गातील स्थानकावर येण्याच्या रात्रीच्या वेळा पुढीलप्रमाणे- वडगाव १२.००, तळेगाव १२.०५, घोरावाडी १२.०९, देहुरोड १२.१६, आकुर्डी १२.२१, चिंचवड १२.२५, िपपरी १२.२९, दापोडी १२.३६, शिवाजीनगर १२.४३.