लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भरधाव पीएमपी बसने बसथांब्यावर प्रवासी महिलेसह एकाला धडक दिल्याची घटना नेहरु रस्त्यावरील सोनवणे रुग्णालयासमोर घडली. अपघातात महिलेसह तिघे जण जखमी झाले, तसेच पीएमपी बसने रिक्षाला धडक दिली.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण

युवराज बबन नवले (रा. कुरण, ता. जुन्नर), कुसुम विश्वनाथ लोंढे (रा. ताडीवाला रस्ता), फारुक शेख अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीएमपी बसचालक गणेश बाळासाहेब नायकल (वय ३५, रा. कोहिनूर हॉटेलजवळ, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत किशोर बालाजी परदेशी (वय ३८, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरु रस्त्यावरील सोनवणे रुग्णालयासमोर पीएमपी थांब्यावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास नवले, लोंढे थांबले होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने प्रवासी नवले आणि लोंढे यांना धडक दिली. बस थांब्यापासून काही अंतरावर रिक्षाला धडक दिली.

आणखी वाचा-आता महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘हवामान अर्थसंकल्प’

अपघातात नवले, लोंढे आणि रिक्षाचालक शेख जखमी झाले. अपघातानंतर तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात नवले गंभीर जखमी झाले असून, अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. बसचालक नायकल याच्या चुकीमुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हवालदार येलपले तपास करत आहेत.