पुणे : पुण्याच्या मावळमध्ये वाघोली येथील घटनेची पुनरावृत्ती टळली. अपघातात सुदैवाने दोघेजण थोडक्यात बचावले आहेत. ही घटना आज सकाळी अकराच्या च्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पो चालक दिपकसिंग राजपूत ला अटक केली आहे. राजपूतने मद्यपान केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
आणखी वाचा-वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास पुण्यातील वाघोली मध्ये मद्यधुंद डंपर चालकाने काही जणांना चिरडल्याची घटना घडली होती. तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेची पुनरावृत्ती पुण्याच्या मावळमध्ये टळली आहे. टेम्पो चालक मद्यधुंद दिपकसिंग राजपूत शिरगाववरून सोमटने फाटाच्या दिशेने येत होता. भरधाव टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो एका बाजूला पलटी झाला. सुदैवाने रस्त्यावरून चालत चाललेल्या दोन पादचारी थोडक्यात बचावले आहेत. मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी टेम्पो चालक दिपकसिंग ला अटक केली आहे. तो मद्यधुंद असल्याचं उघड झालं आहे.