पुणे : अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारने सोमवारी (२२ जानेवारी) सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मात्र या सुटीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २२ जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २२ जानेवारी रोजी आयोजित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. २२ जानेवारी रोजीच्या परीक्षा आयोजनाबाबत यशावकाश कळवण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या नव्या मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मंदिर ट्रस्टतर्फे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक दृकश्राव्य माध्यमातून हा सोहळा पाहू शकणार आहेत. केंद्र सरकारने सोमवारी अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारनेही सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.