पुणे : श्रीलंकेतील गोड्या पाण्यातील तळ्यांमध्ये आढळणारा सोनेरी पाठ असलेल्या बेडकाचे (श्रीलंकन गोल्डन बॅक्ड फ्रॉग) पूर्व घाटाच्या परिसरातील आंध्र प्रदेशात अस्तित्व असल्याचे नव्याने समोर आले आहे. आतापर्यंत या प्रजातीचे अस्तित्व केवळ श्रीलंकेत असल्याचे मानले जात होते.

भारतीय प्राणिशास्त्रीय सर्वेक्षण संस्था, आंध्र प्रदेश जैवविविधता मंडळ यांनी केलेल्या संयुक्त संशोधनाचा शोधनिबंध झूटाक्सा या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. या संशोधनात हैदराबाद येथील भारतीय प्राणिशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेतील भूपती भरत, डॉ. दीपा जैस्वाल, डॉ. एस. एस. जाधव, डॉ. करुथापांडी एम., पुणे येथील भारतीय प्राणिशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेतील डॉ. के. पी. दिनेश, आंध्र प्रदेश जैवविविधता मंडळाच्या डॉ. कल्याणी कुंटे यांचा सहभाग होता. देशभरात उभयचर प्राण्यांच्या ४५४ प्रजाती आहेत. त्यांतील पश्चिम घाटात २५३, तर पूर्व घाटात २७ प्रजाती आहेत. सोनेरी पाठ असलेल्या बेडकाला शास्त्रीय भाषेत हायलाराना ग्रॅसिलिस म्हटले जाते. त्याचा शोध १८२९मध्ये लागला होता. आतापर्यंत ही प्रजाती पूर्व घाटात अस्तित्वात असल्याचे बोलले जात असले, तरी त्याबाबतचे पुरावे उपलब्ध नव्हते. मात्र, आता डीएनए बारकोड विदाच्या साहाय्याने श्रीलंकन सोनेरी पाठीच्या बेडकाची प्रजाती भारतात असल्याचे जनुकीय पुरावे उपलब्ध झाले आहेत. श्रीलंकन सोनेरी पाठीचा बेडूक ही प्रजाती स्वच्छ पाण्यात आढळते. मोसमी पावसाच्या काळात त्यांचा प्रजननाचा हंगाम असतो.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
From Jack the Penguin to Volcano Rabbit This 10 creatures that thrive in volcanic environments
जॅक्स पेंग्विन ते व्होल्कॅनो रॅबिट; धगधगत्या ज्वालामुखीच्या प्रदेशात जगतात हे १० प्राणी
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर
dinasorus highway
१६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक
rare albino Garhwal duck in the Irai Dam area
ईरइ धरण परिसरात अतिशय दुर्मिळ अल्बिनो गढवाल बदक

हेही वाचा : इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील २९ बंगल्यांवर हातोडा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांचा पिंपरी महापालिकेला आदेश

सध्याच्या काळात श्रीलंकन सोनेरी पाठीच्या बेडकाची प्रजाती भारत आणि श्रीलंका यांच्यातील ८०० किलोमीटरच्या हवाई अंतराने विभागली गेली आहे. तसेच त्यांच्यात ०.२ टक्के ते एक टक्का जनुकीय भिन्नता आहे. भारत आणि श्रीलंका एकमेकांना जोडलेले असतानाच्या काळात सोनेरी पाठीचे बेडूक सध्याच्या पूर्व घाटात आलेले असू शकतात, असे डॉ. दिनेश यांनी सांगितले.

हेही वाचा : पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर…यंदा किती विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती?

विसाव्या प्रजातीची नोंद

श्रीलंकन सोनेरी पाठीच्या बेडकाच्या शोधामुळे पूर्व घाटाच्या जंगलातील बारमाही प्रवाह, स्वच्छ पाण्याच्या स्रोतांचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. यापूर्वी भारतीय उपखंडात सोनेरी पाठीच्या बेडकांच्या १९ प्रजातींची नोंद झाली आहे. त्यातील ११ प्रजाती या भारतीय प्रदेशनिष्ठ आहेत. आता भारतात स्वच्छ पाण्यातील श्रीलंकन सोनेरी पाठीचा बेडूक या विसाव्या प्रजातीची भर पडली आहे.

Story img Loader