पुणे-लोणावळा लोकलच्या फे ऱ्या वाढवाव्यात, यासह विविध मागण्या खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. पुणे विभागाशी संबंधित प्रश्नांसाठी पुण्यात येऊन बैठक घेण्याचे आश्वासन प्रभू यांनी बारणे यांना दिले.
खासदार बारणे यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. कर्जत ते पनवेल लोकल सुरू कराव्यात, खोपोली-पनवेल ते सीएसटी लोकल फे ऱ्या वाढवाव्यात, रेल्वे स्थानकांवरील असुविधा दूर कराव्यात, आदी प्रश्नांकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर, पुणे विभागीय स्तरावरील प्रश्नांसाठी पुण्यात येऊन बैठक घेण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले. या वेळी ते रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधतील, असे बारणे यांनी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-12-2014 at 02:54 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srirang barne demands to increase frequency of pune lonavla local