दहावी व बारावीतील ग्रामीण विद्यार्थ्यांना पुढील करीअरविषयी तसेच आवडीच्या शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य दिशा मिळवून देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
ध्यास यूथ फोरम, सक्षम सेवा संस्था व डिजिटल एम्पॉवरमेंट फाऊंडेशनतर्फे गेल्याच पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणींविषयी मार्गदर्शन केले जाणार असून, त्याला आवडीच्या शाखेतील प्रवेशाविषयी माहिती, त्यासाठी काय करावे लागते, कोणती शाखा (साईड) निवडावी, सीईटीनंतरचा पर्यायी अर्ज कसा भरावा, अशा अनेक प्रश्नांची माहिती व त्याबद्दल मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ९९६००२२३३३ या क्रमांकावर एसएमएसद्वारे आपले प्रश्न पाठवायचे असून त्यात स्वत:चे नाव, संबंधित शाखेचे नाव असा एसएमएस करायचा आहे. त्याला त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करीअरविषयी हेल्पलाइन
दहावी व बारावीतील ग्रामीण विद्यार्थ्यांना पुढील करीअरविषयी तसेच आवडीच्या शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.
First published on: 07-04-2015 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc hsc career helpline