राज्य मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. मात्र, मार्चच्या परीक्षांमध्ये राबवण्यात येणारे एक दिवसाआड परीक्षा घेण्याचे धोरण या परीक्षांमध्ये राबवण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सलग परीक्षा द्यावी लागणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबरच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी या परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा ११ ऑक्टोबपर्यंत, तर बारावीची परीक्षा १८ ऑक्टोबपर्यंत चालणार आहे.
गेली काही वर्षे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून एक आड एक दिवस परीक्षा घेण्याचे धोरण राज्य मंडळाने अवलंबले आहे. मात्र, या सत्राची ही परीक्षा सलग घेण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या परीक्षेला प्रामुख्याने मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा गुणवत्ता सुधार करण्यासाठी काही विषयांची परीक्षा देणारे विद्यार्थी असतात. मात्र, या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून वेगळा न्याय लावण्यात आला आहे. या परीक्षेला सगळेच विद्यार्थी सगळ्याच विषयाची परीक्षा देत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार आहे. मात्र, ऑक्टोबरच्या परीक्षेला दहावीच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले विज्ञान व तंत्रज्ञान आणि गणित या विषयांची परीक्षाही सलग होत आहे. विज्ञान तंत्रज्ञान विषयाची परीक्षा ३० सप्टेंबर आणि सामान्य गणित विषयाची परीक्षा १ ऑक्टोबरला होत आहे. भाषा आणि इतिहास, भूगोलाची परीक्षाही सलगच होत आहे. त्याचप्रमाणे बारावीला विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांची परीक्षाही सलग होणार आहे. भौतिकशास्त्राची परीक्षा ३० सप्टेंबर आणि रसायन शास्त्राची परीक्षा १ ऑक्टोबरला होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा