महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (७ जून) जाहीर होणार असून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. शाळांमध्ये १५ जूनला गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. गुणपत्रक मिळाल्यानंतर २५ जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2013 रोजी प्रकाशित
दहावीचा निकाल शुक्रवारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (७ जून) जाहीर होणार असून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
First published on: 05-06-2013 at 05:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc results will be declared on 7 june