महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवारपासून (२५ सप्टेंबर) सुरू होत आहे.
राज्यात २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये दहावीची आणि २५ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीमध्ये बारावीची परीक्षा होणार असून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यभरातून दहावीची परीक्षा २ लाख १६ हजार ३०६ विद्यार्थी तर बारावीची परीक्षा १ लाख ८१ हजार २९२ विद्यार्थी देणार आहेत.
परीक्षेच्या काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ासाठी भरारी पथके, केंद्रांचे व्हिडिओ चित्रीकरण अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत.
हेल्पलाइन क्रमांक-
पुणे- (०२०) ६५२९२३१६ / ६५२९२३१७, नागपूर- (०७१२) २५६०२०९, औरंगाबाद – (०२४०) २३३४२२८, मुंबई – (०२२) २७८९३७५६ / २७८८१०७५, नाशिक – (०२५३) २५९२१४३, कोल्हापूर – (०२३१) २६९६१०३, अमरावती – (०७२१) २६६२६०८, लातूर – (०२३८२) २२८५७०, कोकण – (०२३५२) २३१२५० / २२८४८०
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची आणि बारावीची परीक्षा २५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुणे विभागीय मंडळातर्फे समुपदेशन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्य़ातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान काही अडचण आल्यास त्यांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मदतकक्षाशी संपर्क साधावा. पुणे जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी ८६००५२५९०८ किंवा ९८२२९९१३९१ या क्रमांकावर, सोलापूर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी ९४२०५४२६५४ या क्रमांकावर आणि नगर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी ९७६३५५७१३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागीय मंडळाने केले आहे.