पुण्यातील स्वारगेट येथील शंकर महाराज पुलावर राज्य परिवहन मंडळाच्या बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असली तरी सुदैवाने जिवितहानी झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास शंकर महाराज पुलावर सातारा ते स्वारगेट मार्गावरील एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. ब्रेक फेल झाल्याने या बसने सात ते आठ वाहनांना धडक दिली. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे स्वागरगेटमधील शंकर महाराज पुलाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने,नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागले. या प्रकरणाचा महामंडळाकडून तपास केला जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

Story img Loader