जेजुरी : बारामती आगाराची बस पुण्याकडे जात असताना जेजुरी बसस्थानकामध्ये या गाडीच्या चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वाहकाचा मृत्यू झाला. नीलेश एकनाथ शेवाळे (वय ५२) असे चालकाचे नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर नीरा येथील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवाळे हे सकाळी मुरूम येथून राज्य परिवहन महामंडळाची गाडी घेऊन पुण्याकडे निघाले होते. बस जेजुरी बसस्थानकामध्ये आल्यानंतर शेवाळे बसमधून खाली उतरले आणि छातीत दुखत असल्याची माहिती स्थानकातील कर्मचाऱ्यांना देत असतनाच ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले. शेवाळे यांना गाडीतच त्रास जाणवत असावा. मात्र, जेजुरी बसस्थानकापर्यंत त्यांनी गाडी आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असे जेजुरी बसस्थानकाचे प्रमुख रविराज घोगरे यांनी सांगितले.

Story img Loader