पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या पुणे विभागात शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठीची जाहिरात www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एसटीच्या पुणे विभागातील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज अंतिम तारीख २२ जानेवारी आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ६००रुपये आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी ३०० रुपयांचा धनार्कष एसआरटीसी एसटी फंड अकाउंट पुणे या नावाने काढून तो अर्जासोबत जोडावा लागेल. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक, एसटी विभागीय कार्यालय, शंकरशेठ रस्ता, पुणे या पत्त्यावर १६ ते २२ जानेवारी या कालावधीत समक्ष हजर राहून सकाळी १० ते सायंकाळी ५:१० या कार्यालयीन वेळेत (शनिवार व रविवार) वगळून) सादर करावी, अशी माहिती विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी दिली.
पुढील पदांसाठी भरती
- मोटार मेकॅनिक व्हेईकल – पदे ७१ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील मोटार यांत्रिक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- ऑटो इलेक्ट्रिशियन – पदे २५ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – पदे ३२ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील शीट मेटल अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- मेकॅनिक डिझेल – २६ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- वेल्डर – पदे २० – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील वेल्डर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- पेंटर – पदे ४ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील पेंटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- मेकॅनिक (एअर कंडिशन) – पदे ४ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील यांत्रिकी (रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- टर्नर – पदे ४ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील टर्नर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- बेंच फिटर/फिटर – पदे २ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील बेंच फिटर/फिटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
- कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅमिंग असिस्टंट – पदे ४ – दहावी उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआयमधील कॉम्प्युटर ऑपरेटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण