पुणे : ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. या प्रकरणी निलेश श्रीधर ताटे (वय ३५, रा. कर्वेनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास सुनील कांबळे (वय ३३) याने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास कांबळे याचे ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी ताटेला होता. या कारणावरुन ताटेने कांबळेला शिवीगाळ करून हातावर कोयत्याने वार केला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2022 रोजी प्रकाशित
अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रावर कोयत्याने वार; कर्वेनगर भागातील घटना
ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली.
Written by लोकसत्ता टीम
पुणे

First published on: 12-09-2022 at 14:27 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stabbing friend suspicion immoral relationship incidents karvenagar area pune print news ysh