लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिले आहेत. विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – डीपीआर) येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचे लवकरच ‘टेक ऑफ’ होईल, असा दावा केला जात आहे.

Image of Elon Musk, Chris Anderson, or a related graphic
Elon Musk : “तुमच्या पोस्ट्समुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो”, TED Talks च्या प्रमुखांनी एलॉन मस्क यांना फटकारले
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
ajit pawar sharad pawar (7)
Sharad Pawar NCP: सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांना होती अजित पवार गटाकडून ‘ऑफर’, पडद्यामागे घडतंय काय?
Image Of Yogesh Kadam
Raj Thackeray : “मनसेने मते खाल्ल्यामुळे आमचे १० उमेदवार पडले”, राज ठाकरेंच्या पक्षावर शिंदे गटाच्या मंत्र्याचा आरोप
Traffic congestion persists despite 33 bridges in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ३३ पूल; वाहतूककोंडी मात्र कायम
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
panvel grp constable death
शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

राज्यातील विमानतळ, विमानसेवा आणि विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्यामध्ये विमानतळाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरण, सैन्य दल, महाराष्ट्र विमानतळ महामंडळाचे आणि राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये ३३ पूल; वाहतूककोंडी मात्र कायम

‘विमान वाहतूक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातील वाढ विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. विमानतळाचा डीपीआर सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच, मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यन्वित करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे,’ असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

धावपट्टी वाढविण्यासाठी सहा महिन्यांत भूसंपादन

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठीचा ओएलएस पूर्ण झाले असून, भूसंपादन येत्या सहा महिन्यांत करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढवण्यास मदत होऊन पुणेकरांना दिलासा मिळणार आहे, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोेळ यांनी केला.

आणखी वाचा-आधी निधी द्या, मग स्वतंत्रपणे मूल्यमापन करा; यूजीसीच्या ‘एनईपी’ अंमलबजावणी प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून प्रतिक्रिया

पुण्याचे सध्याचे विमानतळ सुसज्ज आणि अत्याधुनिक सोई सुविधायुक्त केले आहे. मात्र, शहर आणि परिसराच्या भवितव्याचा विचार करता पुरंदर विमानतळाचे काम वेगाने पूर्ण करावे लागेल. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री

बैठकीतील चर्चेचे मुद्दे

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करणे
  • या विमानतळावरून मार्चपर्यंत देशांतर्गत आणि एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा
  • नागपूर, शिर्डी विमानतळाचे रि-कार्पेटिंगचे काम ३१ मार्च पर्यंत पूर्ण करणे
  • अमरावती विमानतळ येथे नाईट लॅन्डिंगची सुविधा देणे
  • सोलापूर विमानसेवा तत्काळ सुरू करणे
  • कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि नाईट लॅंन्डिंग सुविधा
  • जळगाव विमानतळासाठी नवीन टर्मिनल इमारत
  • गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन
  • रत्नागिरी, गोंदिया, अकोला, छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी सुविधा

Story img Loader