प्रकाश खाडे जेजुरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या यात्रेसाठी सुमारे चार लाख भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी एक वाजता पेशवे इनामदार यांनी हुकूम करताच वाजत गाजत पालखीमध्ये खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्ती ठेवून पालखी सोहळा कऱ्हा नदीवर स्नानासाठी निघाला. यावेळी ” सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करीत हजारो भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली यामुळे सारा खंडोबा गड पिवळा धमक झाला. यंदा नेहमीपेक्षा गर्दी प्रचंड असल्याने खंडोबा गडाला असणाऱ्या तीनही दरवाजामध्ये भाविकांची प्रचंड रेटारेटी व चेंगराचेंगरी झाली.
नेमकी काय घडली घटना?
आज दुपारी दीड वाजता पालखी गडाजवळील यशवंतराव महाराज यांना भेटली, तिथून निघाल्यावर बानुबाई मंदिराकडे जाताना गणपती मंदिराच्या मागील कमानीजवळ भाविकांचा प्रचंड लोंढा आल्याने पालखी एका बाजूला सरकली, अचानक हा प्रकार झाल्याने पालखी समोर सनई वादन करीत असलेले घडशी समाजातील अनेक तरुण खाली कोसळले. प्रचंड चेंगराचेंगरी झाली, खंडोबाची पालखी अवजड असल्याने खांदेकर्यांनी मोठ्या कौशल्याने पालखी सावरली. पाण्याची बंद टाकीजवळ अनेक जण चेंगरले,घडशी समाजातील पाच सनई वादनकारांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या.अचानक झालेल्या या चेंगराचेंगरीमध्येअनेक भाविक पण जखमी झाले.त्यांना मुका मार लागला सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
हे पण वाचा- जेजुरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबूब पानसरे खून प्रकरणात आणखी एक जण अटकेत
जेजुरीत झालेल्या या दुर्घटनेमध्ये माऊली मल्हार मोरे (वय २५) विशाल राजेंद्र मोरे (वय २३ ) मयांक सचिन कदम( वय १३) निलेश अरुण मोरे( वय ३०) हे जखमी झाले आहेत, यांना बरगडी,हात,पाय नाक आदी इजा झाल्या आहेत. या जखमींना जेजुरीतील आनंदी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमी झालेले सर्वजण खंडोबाचे मानकरी आहेत. प्रत्येक पालखी सोहळ्यामध्ये ते पालखी समोर सनई ढोल वाजवण्याची सेवा करतात. पालखी रस्त्याने जात असताना अत्रे पुलाजवळ गर्दीत ढकलाढकली झाल्याने दोन महिला किरकोळ जखमी झाल्या.
हे पण वाचा- श्री जेजुरी देवस्थानचा वाद मिटला, घेतला ‘हा’ निर्णय
खंडोबा गडावर पालखी सोहळ्याला नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी
आषाढ महिन्याच्या अखेरीस आलेल्या आजच्या सोमवती यात्रेतील पालखी सोहळ्याला खंडोबा गडावर नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी होती खंडोबा गडावर श्री मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपट खोमणे, मंगेश घोणे,ऍड विश्वास पानसे, डॉ राजेंद्र खेडेकर, ऍड पांडुरंग थोरवे, अनिल सैंदाडे, अभिजीत देवकाते,मुख्याधिकारी राजेंद्र जगताप यावेळी उपस्थित होते. राज्याच्या बऱ्याचश्या भागात पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत,सध्या शेतीची कामे खोळंबल्याने जेजुरीला अनेक जण आले. याशिवाय आजची भर सोमवती असल्याने गर्दी वाढली मुंबई परिसरातून आलेल्या कोळी बांधवांची संख्या लक्षणीय होती. कडेपठार या खंडोबाच्या मूळ स्थानावरील मंदिरात देवदर्शन साठी भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.हजारो भाविकांनी कऱ्हा नदीत पवित्र स्नान केले.पालखी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता धालेवाडी येथील कऱ्हा नदीकाठी पोहचला.
पालखीतील खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना वेदमंत्राच्या घोषात स्नान घालून पुन्हा पालखी रात्री नऊ वाजता खंडोबा गडावर आणण्यात आली. तेथे रोजमोरा (ज्वारी) वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली गावातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते अनेक दुकानदारांनी रस्त्यावरच आपली दुकाने टाकल्याने रस्त्याने चालताना भाविकांना खूप त्रास जाणवला.