केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मराठा, मुस्लीम आणि ब्राह्मण समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या पाठिंब्याचा निषेध करत त्यांची भूमिका फसवी आणि दिशाभूल करणारी आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
शरद पवार यांनी १० ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडताना मराठा, मुस्लीम आणि ब्राह्मण समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याला पाठिंबा दिला होता. ही भूमिका दिशाभूल करणारी आहे, असे गायकवाड म्हणाले. मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करावा, खा. नचिपन कमिटीचा अहवाल स्वीकारावा, ५१ टक्के ओबीसींना ५१ टक्के आरक्षण द्यावे, क्रिमिलेअर रद्द करावे, नोकरीतील बढतीमध्ये आरक्षण द्यावे, लोकसभा व विधानसभेमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी जागा आरक्षित ठेवाव्यात, एससी व एसटी वर्गाला मिळत असलेल्या आरक्षणाचा लाभ ओबीसींना मिळावा, या मागण्या संभाजी ब्रिगेडतर्फे या वेळी करण्यात आल्या.
‘मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका फसवी व दिशाभूल करणारी’
' केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मराठा, मुस्लीम आणि ब्राह्मण समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या पाठिंब्याचा निषेध करत त्यांची भूमिका फसवी आणि दिशाभूल करणारी आहे.'
First published on: 14-08-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stand of sharad pawar on maratha reservation is not liable pravin gaikawad