पुणे : राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणेशवाचे इयत्तानिहाय स्वरूप निश्चित केले आहे. त्यानुसार पहिली ते चौथीच्या मुलींना पिनो फ्रॉक, पाचवी ते सातवीच्या मुलींना शर्ट आणि स्कर्ट, आठवीच्या मुलींसाठी सलवाज कमीज ओढणी, तर पहिली ते सातवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि हाफ पँट, तर आठवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि फुल पँट असा गणवेश दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचे शुद्धीपत्र प्रसिद्ध केले. शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना समग्र शिक्षा योजनेअंतर्गत एकसमान रंगांचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतमार्फत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४पासून लागू केला. मात्र शैक्षणिक वर्ष २०२३०२४साठी या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत १८ ऑक्टोबर रोजी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्काऊट गाईड विषयाला अनुरूप असेल असा आकाशी आणि गडद निळा असे रंग असलेला गणवेश असावा, मुलांना शर्ट-पँट, मुलींना सलवार कमीज, ओढणी, शर्टवर शोल्डर स्ट्रीप, दोन खिसे असावेत, असे स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा >>>जरांगे यांची पदयात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून इयत्तानिहाय गणवेशाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. पहिली ते चौथीच्या मुलींना पिनो फ्रॉक, पाचवी ते सातवीच्या मुलींना शर्ट आणि स्कर्ट, आठवीच्या मुलींसाठी सलवाज कमीज ओढणी, तर पहिली ते सातवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि हाफ पँट, तर आठवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि फुल पँट असा गणवेश दिला जाणार आहे. नव्या स्वरुपाच्या गणवेशाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Standard wise format fixed under free uniform scheme pune print news ccp 14 amy
Show comments