पिंपरी पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागारांच्या निष्क्रिय कामगिरीवर स्थायी समितीत सदस्यांनी प्रचंड आगपाखड केली. बीआरटीसाठी सहा कोटी खर्च करण्याचा विषय तहकूब ठेवण्यात आला.
सभापती नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बीआरटीसाठी सहा कोटी देण्याचा विषय होता, त्यावरून सदस्यांनी आतापर्यंतच्या सल्लागारांच्या निष्क्रिय कामगिरीवर कडाडून हल्ला चढवला. बीआरटीकरिता सेफ्टी ऑडिटचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे, त्यासाठी १६ लाख रूपये खर्च आहे. त्याचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच बीआरटीचे काम सुरू करण्याची व सहा कोटी खर्च करण्याची अधिकाऱ्यांना घाई का आहे, असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. सगळी महत्त्वाची कामे सल्लागारांवर सोपवण्यात आली आहेत, त्यांच्या सल्ल्याने महापालिकेचे काही भले झाले नाही. सर्वकाही सल्लागारच करणार असतील तर पालिकेचे अधिकारी काय करणार, पालिकेचे कोटय़वधींचे प्रकल्प रखडले, त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांकडेच मोठे प्रकल्प सोपवण्यात आले, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा