केंद्रीय संरक्षण विषयक स्थायी समितीने नुकतीच भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाला भेट दिली. सदर समिती अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने पुणे भेटीवर आली असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट देऊन येथे प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या मुलींच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थिनींशी संवाद साधल.

हेही वाचा – पुणे : जुने मखर द्या, नवीन घेऊन जा ; अनिल कांबळे यांचा अभिनव उपक्रम

संरक्षण विषयक स्थायी समितीतर्फे संरक्षण दलांच्या धोरणात्मक कार्यकारी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दक्षिण कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. ओडिशाचे खासदार जुएल ओराम यांच्या नेतृत्वाखालील ही १३ सदस्यीय समिती सध्या अभ्यास दौऱ्यावर आहे. दक्षिण कमांड मुख्यालयाला दिलेल्या भेटीत समितीच्या सदस्यांना दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी कमांडच्या योगदानाबाबत माहिती दिली. देशाच्या स्वातंत्र्यापासून या कमांडने देशाच्या रक्षणार्थ दिलेल्या योगदानाचा समृध्द इतिहास, वारसा, देशाची सुरक्षितता आणि प्रादेशिक अखंडत्व कायम राखण्यात या कमांडने बजावलेल्या भूमिकेबाबत ले. जनरल नैन यांनी समितीला संबोधित केले. दक्षिण कमांडच्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांशी यावेळी संवाद साधला. भारतीय लष्कराच्या सर्व कमांडपैकी सर्वात जुनी कमांड म्हणून दक्षिण कमांड सर्वज्ञात आहे.

हेही वाचा – पुणे : लिंबांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात ; दिवाळीपर्यंत लिंबांच्या दरात वाढ

या कमांडकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. संरक्षण विषयक स्थायी समितीची स्थापना संसदेतर्फे करण्यात आली असून या समितीमध्ये निवडक संसद सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने निश्चित केलेल्या संरक्षण विषयक धोरणांचे तसेच निर्णयांचे कायद्याच्या दृष्टीकोनातून परीक्षण करणे हा या समितीच्या स्थापनेमागील उद्देश आहे.

Story img Loader