राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उत्तरप्रदेशातून एकास अटक केली. लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन यापूर्वी एटीएसने पुण्यातील दापोडी तसेच काश्मीरमधून दोघांना अटक केली होती. इनामूल हक (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
लष्कर ए तोएबाशी संबंध असल्याच्या संशयावरून जुनैद महंमद (वय २८, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि साथीदार आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून आठ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.
जुनैद, आफताब यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत इनामूल हक लष्कर ए तोएबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसचे पथक उत्तरप्रदेशात रवाना झाले. त्यानंतर हक याला अटक करण्यात आली.