पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा निकाल एकाच दिवशी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल ३१ मे पूर्वी, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य मंडळाची दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत झाली. बारावीची परीक्षा सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी, तर दहावीची परीक्षा सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी यंदा राज्यातील शिक्षकांनी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणी झालेल्या संपामुळे काही दिवस शैक्षणिक कामे होऊ शकली नाहीत.

मात्र त्याचा परिणाम उत्तरपत्रिका तपासणीवर झालेला नाही. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यामुळे राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. बारावीचा निकाल ३१ मे पूर्वी, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State board announce result of class 10th 12th know the date pune print news ccp 14 ysh