पुणे: कात्रज चौक ते खडी मशीन चौका दरम्यान येणार्या रस्त्यांच्या कामांची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान केली.तर अजित पवार हे नेहमीच विकास कामांची पाहणी पहाटेच्या सुमारास करतात.मात्र आज सायंकाळच्या सुमारास अजित पवार यांनी पाहणी दौरा आयोजित केल्याने त्या मार्गावरील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
त्या पाहणी दौर्याबाबत अजित पवार यांच्या सोबत संवाद साधला असता ते म्हणाले की, कात्रज चौक ते खडी मशीन चौक दरम्यान येणार्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे.येथील काम प्रगतीपथावर आहे.मात्र अद्याप ही सकाळी आणि संध्याकाळ च्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुण्याच्या खराब हवेचा केंद्रीय मंत्र्यांना फटका; वाचा घडले काय?
तसेच ते पुढे म्हणाले की,मी नेहमीच सकाळी लवकर येऊन विकास कामांची पाहणी करतो.जेणेकरून नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये. आपल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसू, अन्यथा आपल्याला लोक बोलतात यांना आताच पाहणी करायचे कसे सुचले,असे अजित पवार म्हणताच उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.