पुणे : कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा दारू विक्रीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना न घेता दारू विक्री प्रकरणात ढाबाचालकासह चौघांना अटक करण्यात आली. आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालायाने ढाबाचालकाला एक लाख रुपयांचा दंड, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

राज्य उत्पादन शुल्क ‘सी ‘ विभागाच्या पथकाने कोथरूड येथील हॉटेल खिंड या ढाब्यावर नुकताच छापा टाकला. ढाबा चालक योगेश सुरेश माथवड याने ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिल्याचे आढळून आले. त्यानंतर माथवड यांच्यासह चार ग्राहकांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. कदम, दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदीप लोहकरे, उज्ज्वला भाबड, शरद भोर, गोपाळ कानडे, सचिन इंदलकर यांनी ही कारवाई केली.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sale of illegal liquor pune, illegal liquor pune, pune,
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

हेही वाचा…पुणे : गांजा विक्री प्रकरणात अटक केलेली महिला पोलीस ठाण्यातून पसार

लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदा मद्य विक्री, तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात आली असून, ढाबा, हॉटेलची अचानकपणे तपासणी सुरू करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध या पुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निरीक्षक एस. एस. कदम यांनी दिला आहे.