पुणे : राज्य सरकारने नऊ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओ) निर्मिती केली आहे. यासाठी राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रुपांतर आरटीओमध्ये करण्याचा आदेश गृह विभागाने शुक्रवारी काढला. नवीन आरटीओंमध्ये पिंपरी-चिंचवड, सातारा, बोरीवली, अहमदनगरचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: राज्यात आता पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा

राज्यातील एकूण नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रूपांतर आरटीओमध्ये करण्यात आले. त्यात पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि.पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली आणि सातारा यांचा समावेश आहे. यामुळे काही आरटीओंच्या अंतर्गत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही बदल झालेला आहे. पुणे आरटीओत आता बारामती उपप्रादेशिक कार्यालय असेल. पुण्याच्या अंतर्गत असलेले पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर हे आता वेगळे आरटीओ असतील. सोलापूर अंतर्गत अकलूज उपप्रादेशिक कार्यालय असेल. याचप्रमाणे इतर आरटीओंमधीलही रचना बदलण्यात आली आहे.

पदोन्नतीचा मार्ग खुला

राज्य सरकारने परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीतील सुधारित आकृतीबंधासही मान्यता दिलेली आहे. यामुळे मागील काही काळापासून परिवहन विभागातील रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची आता प्रादेशिक परिवहन अधिकारी होतील.

राज्यातील नवीन आरटीओ

– पिंपरी-चिंचवड

– जळगाव

– सोलापूर

– अहमदनगर

– वसई (जि.पालघर)

– चंद्रपूर

– अकोला

– बोरीवली

– सातारा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government to open nine new rto office in maharashtra pune print news stj 05 zws