पुणे: शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले तर दुःख व्हायचं कारण नाही, उलट आनंदच होईल. असं मत राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केले आहे. दत्ता भरणे हे मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर दिसल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भरणे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते मावळ मधील परंदवडी येथे चाणक्य स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. दत्ता भरणे यांनी खेळाचा आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिलं. आपण नेहमीच लहानपण देगा देवा असं म्हणत लहानपणीची आठवण काढत असतो. त्यावेळेसचे खेळ आठवत असतो. आजही आपल्याला फिट राहायचं असल्यास खेळ आणि व्यायाम महत्त्वाचा आहे. मी देखील वेळात वेळ काढून व्यायाम करतो. असं दत्ता भरणे यांनी आवर्जून सांगितलं.

आणखी वाचा- पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये बैठकीदरम्यान शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात देखील शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसले. एकमेकांच्या जवळ बसण्यास टाळण्याचे पाहायला मिळालं होतं. याच प्रश्नावर उत्तर देताना दत्ता भरणे यांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर अवघ्या देशातील जनतेला आनंद होईल, यात दुःख व्हायचं कारण नाही. असं मत व्यक्त केलं.