पिंपरी : जीवन म्हणजे हजार दोन हजार कोटींचे पॅकेज नाही, आयुष्य म्हणजे कंपनी नाही, आयुष्य म्हणजे तुम्ही किती तास काम करता यालाही नाही. आम्ही यश शोधतो, समाधान नाही. ४० टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्याला ६० टक्के गुण मिळाले तर ते यश नाही. यश म्हणजे खिशात ठेवता येईल अशी गोष्ट नाही, यश म्हणजे आकाशात पकडता येण्यासारखी गोष्ट नाही, असे मत तारक मेहता का उल्टा चष्मा फेम या हिंदी मालिकेतील माजी अभिनेते, कवी शैलेश लोढा यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील बी-स्कूलच्या पाचव्या व्या दीक्षांत समारंभात प्रमुख लोढा बोलत होते. सध्याची पिढी हे राष्ट्राचे भविष्य आहे, राष्ट्र आणि पृथ्वी आधी येतात आणि मग बाकी सर्व काही. तुम्ही नोकरी देणारे बनता, नोकरी घेणारे नाही.

हेही वाचा >>>पुणे : थेऊर येथे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीवर गुन्हा दाखल

प्रवेश ज्ञानासाठी आहे आणि प्रस्थान सेवेसाठी आहे असे सांगून कवी लोढा म्हणाले,  ज्ञान आणि माहिती यात फरक आहे. माझ्या आईने मला शिकवलेली भाषाशैली मी वापरतो. त्यामुळे आई-वडिलांना आयुष्यात कधीही विसरू नका. पदवी घेऊन जगात गेल्यावर अडथळे येतील. पण घाबरू नका, भक्कम इराद्याने पुढे जा. गंतव्य नक्कीच तुमच्या पायांचे चुंबन घेईल. डॉ.अमोल गावंडे यांनी सांगितले की, यावर्षी ८४ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी आणि समाज घडवण्यासाठी केला पाहिजे. प्र-कुलगुरु डॉ.सोमनाथ पाटील, डॉ.रोहानी पाटील, डॉ.अमोल गावंडे यावेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement of shailesh lodha of taarak mehta ka ooltah chashma fame about life pune print news ggy 03 amy