देहूरोड येथे लोहमार्ग ओलांडत असताना भेगडेवाडी स्थानकाच्या स्टेशन मास्तरला पुणे-भुसावळ रेल्वेने उडविले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
राकेश के. मीना (वय ४०, रा. प्रगती कॉलनी, विकासनगर, देहूरोड) असे त्यांचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना हे दुपारी नातेवाइकांसह गावी जाण्यासाठी देहूरोड रेल्वेस्थानकावर आले होते. या ठिकाणाहून ते त्यांच्या जोधपूरकडे जाणार होते. दुपारी लोहमार्गावरून पुणे-लोणावळा लोकल पुढे गेल्यानंतर मीना हे पाणी आणण्यासाठी लोहमार्ग ओलांडून विरुद्ध दिशेच्या फलाटावर गेले. त्या ठिकाणाहून पाणी घेऊन परतत असताना त्यांना पुणे-भुसावळ रेल्वेने उडविले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार सोमनाथ जफरे हे करत आहेत.

Story img Loader