उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण १४ फेब्रुवारीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
Ruhi Chaturvedi announces pregnancy
Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?

विद्यापीठात झालेल्या बैठकीला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते. सामंत म्हणाले, की विद्यापीठात साकारण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने, तर कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित राहतील. देशात प्रथमच सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी तीन कोटींचा निधी देण्यात येईल. त्यासाठी कुलगुरूंना प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

वसतिगृह सुरू करण्यास मान्यता

राज्यातील महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, करोना स्थितीचा आढावा घेऊन वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वसतिगृहाच्या क्षमतेच्या २५ टक्के किंवा ५० टक्के किंवा किती क्षमतेने प्रवेश देऊन वसतिगृह सुरू करायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असे सामंत यांनी सांगितले. 

ऑफलाइन परीक्षेची तयारी करावी  

करोना काळात ऑनलाइन परीक्षा ही तात्पुरती व्यवस्था होती. ऑनलाइन परीक्षा हा कायमस्वरुपी उपाय असू शकत नाही. आता महाविद्यालये सुरू झाल्याने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची मानसिक तयारी करावी, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.