थेऊरच्या गणपती मंदिरामध्ये आजपासून पाहता येणार
विद्याधर कुलकर्णी, पुणे</strong>
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदूवी स्वराज्याच्या पराक्रमाची पताका केवळ दिल्लीच्या तख्तापर्यंतच नव्हे तर अटकेपार नेणारे श्रीमंत माधवराव पेशवे यांचा पुतळा त्यांच्या एका लघुचित्रावरून साकारण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या क्षेत्र थेऊर येथील चिंतामणी मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर बसविलेला हा पुतळा महाराष्ट्र दिनी बुधवारपासून (१ मे) पाहता येईल.
पानिपतच्या रणसंग्रामात गलितगात्र झालेल्या मराठेशाही आणि महाराष्ट्राला, ज्यांनी तळपत्या पराक्रमाने आणि संयमी मुत्सद्देगिरीने गतवैभव प्राप्त करून दिले, त्या श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे मूळ लघुचित्र शैलीतील व्यक्तिचित्र महाराष्ट्र इतिहास संशोधक मंडळाकडे आहे. हे चित्र डोळ्यासमोर ठेवून प्रसिद्ध शिल्पकार-मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांनी फायबर ग्लासमध्ये पुतळा साकारला आहे. या पुतळ्याला पीयू कोटिंग देण्यात आले आहे. त्यामुळे हा पुतळा हाताळणे सहज शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे धुवूनही या पुतळ्याची स्वच्छता करता येईल.
माधवराव यांना अल्प कारकीर्द मिळाली. १७४५ ते १७७२ अशा अवघ्या २७ वर्षांच्या आयुष्यात माधवराव यांनी मैदानावरील लढायांमध्ये विजयश्री संपादन करण्यासह सर्वच आघाडय़ांवर देदीप्यमान कामगिरी केली. पानिपतचा आघात त्यांनी आपल्या उत्तम संघनटकौशल्याच्या आधारे सोसला आणि प्रशासकीय पकड घट्ट ठेवत मराठी राज्य गतवैभवाच्या शिखरावर नेले. आजारपणामुळे त्यांच्या झळाळत्या कारकीर्दीचा अंत थेऊर येथील श्रीचिंतामणी देवालय परिसरात झाला. त्यांचे पुण्यस्मरण म्हणून देवस्थान समितीने माधवराव पेशवे यांच्या पुतळ्याची जबाबदारी मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्यावर सोपवली. वास्तुविशारद सुबोध दीक्षित यांच्या माध्यमातून हे काम माझ्याकडे आले. प्रसिद्ध चित्रकार-पुरातत्त्वज्ञ डॉ. श्रीकांत प्रधान, इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे, मुरुडकर झेंडेवालेचे गिरीश मुरुडकर यांच्याशी चर्चा करून दोन महिन्यांच्या अथक परिश्रमांनी माधवराव पेशवे यांचा अस्सल चित्राप्रमाणे पुतळा घडवला आहे, असे धोंडफळे यांनी सांगितले. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे अस्सल चित्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या खजिन्यात असल्याचे मंदार लावटे यांनी सांगितले आणि चित्रकार-पुरातत्त्वज्ञ डॉ. श्रीकांत प्रधान यांच्याशी माझी भेट घडवून आणली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मूळ चित्रानुसार पुतळा फायबर ग्लास माध्यमात घडवला. मुघल चित्रकाराने चित्रात दर्शवलेले सर्व बारकावे पुतळ्यात हुबेहूब यावेत, यासाठी प्रयत्न केले आहेत. माधवरावांनी या चित्रात अर्धवीरासन घातले आहे. त्यांच्या मस्तकावर पगडी आहे. चुणीदार अंगरखा आहे. चेहऱ्यावर वयाचा कोवळेपणा असला तरी त्यांची मुद्रा करारी आहे. हे वैशिष्टय़ जपण्याचा प्रयत्न केला आहे, असे धोंडफळे यांनी सांगितले.
अर्धवीरासनातील पुतळा
माधवराव पेशवे यांचा पुतळा अर्धवीरासनात आसनस्थ आहे. मूळ चित्रातही असेच आहे. असे आसन पाठीचा कणा ताठ ठेवते. व्यक्तीला नेहमी दक्ष ठेवते. सदरेत बसताना बहुतेक वेळा असे आसन आढळते. त्यांच्या अंगरख्याची बाही दोन हात मापाची असून, ती दुमडून म्हणजेच चुणीदार बसवली आहे. अंगरख्याचा असा पेहराव व्यक्तीला प्राथमिक सुरक्षा देतो कारण चुणीदार पोशाखामुळे तलवारीचा वारही प्राणांतिक इजा देत नाही, असे डॉ. श्रीकांत प्रधान यांनी सांगितले.