पुणे : राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या रखडलेल्या प्रक्रियेत एक पाऊल पुढे पडले आहे. राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून या तीन विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी तीन शासन प्रतिनिधींची नावे दिली आहेत.

हेही वाचा <<< पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला समाजमाध्यमांचे वावडे ; अधिकृत खाते सुरू करण्याकडे दुर्लक्षच

हेही वाचा <<< राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा

महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल केला होता. मात्र त्या बदलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया रखडली. या पार्श्वभूमीवर प्रा. धनंजय कुलकर्णी, बागेश्री मंठाळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करून निवड प्रक्रियेतील तीन शासन प्रतिनिधींची नावे कळवण्यात आली. त्यानुसार कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर काम करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा <<< व्यावसायिकाला दोन महिलांकडून अडीच लाखाला गंडा

याचिकाकर्ते प्रा. धनंजय कुलकर्णी म्हणाले, की शासनाने कुलगुरू निवडीसाठीच्या प्रक्रियेतील शासन प्रतिनिधींची नावे न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली. याचिकाकर्ता म्हणून मला त्याची प्रत ईमेलद्वारे देण्यात आली. शासन प्रतिनिधींची नियुक्ती झाली ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने राज्यपाल प्रतिनिधी निवड समितीवर नियुक्त केल्यास कुलगुरू निवड प्रक्रिया मार्गी लागून दोन महिन्यांत विद्यापीठांना नियमित कुलगुरू मिळू शकतील.

Story img Loader