पुणे : सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची ७५ लाख रुपयांची रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरुड भागातील एका तरुणाची चोरट्यांनी २५ लाख एक हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. फिनवेस्ट कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला तरुणाला परताव्यापोटी काही रक्कम दिली. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

हेही वाचा – Puja Khedkar : पूजा खेडकरच्या आईला पिस्तूल परवाना प्रकरणात दिलासा, सुनावणी वेळी उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका महिलेची ४२ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादर महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी १५ ऑक्टोबर रोजी संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी बँक खात्यात पैसे जमा करुन घेतले. त्यानंतर महिलेला परतावा दिला नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एकाची चोरट्यांनी सहा लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत.

हेही वाचा – स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन

कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक

कुरिअरद्वारे पाठविलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करुन चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका महिलेची तीन लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी महिलेच्या माेबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी केली. पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market investment bait event kothrud fraud online task fraud vishrantwadi courier action fraud bibwewadi pune print news rbk 25 ssb