लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: पुणे-सोलापूर रस्त्यावरील म्हातोबाची आळंदी परिसरात हिंदुस्थान पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरी करणाऱ्या इंधन माफिया प्रवीण मडीखांबे याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. लोणी काळभोर परिरसरातील बड्या इंधन माफियाला अटक केल्याने इंधन चोरी प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला अहे.

याप्रकरणी प्रवीण सिद्राम मडीखांबे (वय ५१ रा. श्री संतोषी बिल्डींग, संभाजीनगर, लोणी काळभोर) याच्यासह विशाल धनाजी धायगुडे (वय ३१), बाळू अरुण चौरे (वय ३०, दोघे रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा-राज्यातील वाढत्या डोळ्याच्या साथीचे कारण आले समोर; एनआयव्हीचा आरोग्य विभागाला अहवाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून सातारा, सोलापुरसह अन्य जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या तेल डेपोंना भूमिगत वाहिनीतून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. पुणे-सोलापूर महामार्गावरील आळंदी म्हातोबाची परिसरातील डोंगरात २५ जुलै रोजी मध्यरात्री सुमारास भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस झाले होते. या प्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक गौरव केमचंद गुप्ता (वय ३२) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

आणखी वाचा-रत्नागिरी, रायगडमध्ये दोन दिवस पावसाचे; पुणे, साताऱ्याच्या घाट परिसरात जोर वाढणार

इंधन चोरीचे काळे साम्राज्य

आळंदी म्हातोबाची येथील भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी प्रवीण मडीखांबे याच्यावर यापूर्वी इंधन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. प्रवीण आणि साथीदार गेल्या दहा ते बारा वर्षांपासून लोणी काळभोर परिसरात इंधन चोरीते गुन्हे करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stolen fuel by breaking underground channel of hindustan petroleum fuel mafia arrested pune print news rbk 25 mrj
Show comments