‘हर हर महादेव’ आणि येत्या काही काही दिवसांत प्रदर्शित होणारा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर यांनी गुरुवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: वाहतूक कोंडीला वाहनांची संख्या जबाबदार; वाहतूक तज्ज्ञांचा दावा

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी वांढेकर यांनीही मागणी केली. इतिहास परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र कंक, विधी सल्लागार ॲड. मयूर सहाने, शहर सरचिटणीस मयूर गुजर, महासंपर्क प्रमुख संजय पासलकर, महेश बांदल, निवृत्ती कृष्णा धुमाळ या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…”

ऐतिहासिक संदर्भ नसतानाही काल्पनिक पात्र तयार करून या चित्रपटांत प्रेक्षकांची दिशाभूल करण्यात येत आहे. खोटा इतिहास दाखवून व्यक्तिमत्त्वांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक मान्यवरांचे, शिवप्रेमी योद्ध्यांचे वंशज, मराठा समाज यांची नाहक बदनामी झाल्यामुळे समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात यावे, असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop screening of films har har mahadev vedat marathe veer daudle saat demand of all india maratha federation pune print news amy
Show comments