पुणे मेट्रोत चोरट्यांच्या अजब चोरीचा प्रकार उघडकीस आला. मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेतील तांब्याच्या तारा चोरट्यांना लांबवल्याची धक्कादायक घटना बोपोडी मेट्रो स्थानक परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत मंजुनाथ व्यंकटाचलाय (वय ३६, रा. ओैंध रस्ता, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज भरला का? आतापर्यंत ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
मंजुनाथ जेएमडीआर कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक आहेत. या कंपनीकडून मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेचे काम केले जाते. खडकी ते नगर रस्त्यावरील रामवाडी स्थानक दरम्यान मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेचे काम सध्या सुरू आहे. बोपोडी मेट्रो स्थानक परिसरात सिग्नल यंत्रणेसाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या तारा ठेवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी ६९ हजार ३५२ रुपयांच्या तांब्याच्या तारा लांबवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. मंजुनाथ यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक फौजदार तानाजी कांबळे अधिक तपास करत आहेत.