लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : चाकण, एमआयडीसीतील कारखाने टिकविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी एमआयडीसी भयमुक्त करण्यास प्राधान्य आहे. स्थानिक गुंड, कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थापनास त्रास देत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल. कंपनी व्यवस्थापन, उद्योजकांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Akhilesh Shukla
कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
Amitesh Kumar, Pub Culture Pune, Pune Police Commissioner , Coffee with CP , Pune, loksatta news,
पुणे : विरोध ‘पब’ला नाही; गैरप्रकारांना, पोलीस आयुक्तांचे प्रतिपादन, पबसाठी नियमावली आवश्यकच
badshah traffic violation allegation
बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”
atul subhash nikita singhania
Atul Subhash Case: अतुल सुभाष यांच्या पत्नीने फेटाळले छळवणुकीचे आरोप; म्हणे, “जर मी त्याला छळलं असेल तर…”

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चाकण एमआयडीसीत वाहतूक समन्वय तसेच कंपनी व्यवस्थापकांच्या बैठकीत पोलीस आयुक्त चौबे बोलत होते. पोलीस उपायुक्त बापू बांगर, शिवाजी पवार, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश चौडेकर, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, माथाडी बोर्ड सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके, खेडचे नायब तहसीलदार राम बिजे, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीएचे) जितेंद्र पगार यावेळी उपस्थित होते. म्हाळुंगे एमआयडीसीतील विविध १२० कंपन्यांच्या प्रतिनिधींशीही आयुक्तांनी संवाद साधला.

आणखी वाचा-बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात ४० गावांतील सराइतांची चौकशी

पोलीस आयुक्त चौबे म्हणाले, एमआयडीसीतील सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी स्वतंत्र महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे कार्यान्वित केले आहे. तसेच, डायल ११२ क्रमांकावरून पोलीस मदत उपलब्ध होते. औद्योगिक तक्रारींच्या निवारणासाठी पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकामध्ये औद्योगिक तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. कोणतीही समस्या, तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. कंपनीच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच कंपन्यांनी कामगारांच्या वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.

अवजड वाहनांच्या वाहनतळाची समस्या सुटणार

एमआयडीसीतील वाहतूक समस्यांबाबत एक ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. त्यावेळी सूचविलेल्या उपाययोजनांचा व त्यांच्या पूर्ततेचा आढावा पोलीस आयुक्तांनी घेतला. अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी नव्याने जागा उपलब्ध करण्याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले आहे. तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आराखड्याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे एमआयडीसीतील वाहतूक कोंडींची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

आणखी वाचा-जुन्नरमध्ये काँग्रेसचे सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार ?

एमआयडीसीतील ३९ गुंडांना ‘मोक्का’

भयमुक्त एमआयडीसी करण्यासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत सहा गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत ३९ गुंडांवर कठोर कारवाई केली आहे. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्या (एमपीडीए) अंतर्गत ७५ गुंडांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे २६ गुंडांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, अशी माहितीही चौबे यांनी दिली.

Story img Loader