लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त एक जानेवारी रोजी आंबेडकरी चळवळीतील अनुयायांची होणारी गर्दी विचारात घेऊन ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजन करण्याासाठी ग्रामीण पोलिसांकडून चार हजार ८०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहे.

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Santosh Deshmukh murder case Ajit Pawar again consoles Dhananjay Munde  Mumbai news
पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई नाही; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
Mamata Banarjee
Kolkata Police Band : कोलकाता पोलीस बँडला राजभवनात प्रवेश नाकारला; प्रजासत्ताक दिनीच मुख्यमंत्र्यांची राज्यपालांसोबत खडाजंगी!
Delhi Assembly Elections BJP Third Manifesto
भाजपचा तिसरा जाहीरनामा; तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन
On Republic Day Dr ravindra singhal and others were awarded Presidents Medal for Distinguished Service
रवींद्र सिंगल, दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ४३ पदके
Swayamsevak will be personal secretaries of ministers
भाजप, संघ स्वयंसेवक मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवणे, तसेच गर्दीचे नियोजन करण्याच्यादृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यावेळी उपस्थित होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. घातपाती विरोधी पथके तैनात राहणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा-शहरात चोरट्यांचा उच्छाद; शिवाजी रस्ता, बिबवेवाडीत पादचाऱ्यांची लूट

बंदोबस्तास ३३६ पोलीस अधिकारी, तीन हजार ८० पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दीड हजार जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) १२ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. अग्निशमन दलाचे जवान तेथे तैनात राहणार आहेत. आत्पकालिन परिस्थित त्वरीत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तेथे राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने साधनसामुग्री प्रशासनाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने अनुयायी येणार असल्याने चाकण रस्त्यावर २३ एकर जागेवर वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तेथून अनुयायांना विजयस्तंभापर्यत पोहोचण्यासाठी तसेच परतण्यासाठी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

वाहने लावण्याची व्यवस्था

नगर रस्त्याने येणाऱ्या अनुयायींच्या वाहनांसाठी शिक्रापूर (वक्फ बोर्ड) येथे ५९ एकर जागेवर वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर किमान आठ हजार वाहने लावता येतील, तसेच मुंबई-ठाणे परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी चाकण रस्त्यावर २३ एकर जागेवर वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेत किमान चार हजार ८०० वाहने लावणे शक्य होईल. पीएमपीएल बससाठी शिक्रापूर परिसरातील बजरंगवाडीत दहा एकर जागेत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तेथून अनुयायींना वढू बुद्रुक येथे जाण्याासाठी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरेगाव भीमा येथील इनामदार पार्किंगच्या ठिकाणी पीएमपी बस अनुयायांन सोडतील. डिग्रजवाडी फाटा परिसरातून परतणाऱ्या अनुयायांसाठी पीएमपी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

आणखी वाचा-पुणे : सिंहगड रस्ता भागात बंगल्यातून साडेबारा लाखांचा ऐवज चोरीला

कोरेगाव भीमा दृष्टीक्षेपात बंदोबस्त

  • चार हजार ८०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात
  • राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ तुकड्या
  • घातपात विरोधी पथक, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक तैनात
  • पार्किंगसाठी प्रशस्त जागा
  • अभिवादनस्थळी ने-आण करण्यासाठी पीएमपी बस
  • गर्दीचे नियोजन करण्यास प्राधान्य

Story img Loader