नववर्ष स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटक दाखल झाले असून पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. नववर्ष पार्ट्यामधील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली असून हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा >>>पुणे: लष्कर भागातील अनाथलयात आग; १०० मुलांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?

लोणावळा परिसरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी नाके उभे करण्यात आले आहे. पर्यटनस्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करुन गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिला. पर्यटकांची सुरक्षा तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. पर्यटक हाॅटेल आणि खासगी बंगल्यात वास्तव्य करतात. सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत बंगले मालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. पर्यटकांचे ओळखपत्र घेणे, त्यांची नोंद करणे तसेच हॉटेल आणि बंगल्यांच्या परिसराती सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंगले किंवा हॉटेलच्या आवारात काही गैरप्रकार घडल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक डुबल यांनी सांगितले.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, हॉटेल चालक तसेच बंगले मालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळ्यातील व्यावसायिक, नागरिक, पर्यटकांनी काळजी घ्यावी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पर्यटकांनी मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे. नियमांचे पालन करुन सर्वांनी नववर्ष उत्साहात साजरे करावे. – सीताराम डुबल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे</strong>

Story img Loader