लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : इस्त्राइल आणि हमास या दहशतवादी संघटनेत सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद जगभरात उमटले आहेत. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुण्यातील ज्यु धर्मियांच्या परिसरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.

शहरातील लष्कर, कोरेगाव पार्क, वानवडी, कोरेगाव पार्क भागात ज्यु धर्मिय वास्तव्यास आहेत. या भागात प्रार्थनास्थळे आहेत. लष्कर भागात ज्यु धर्मियांचे लाल देऊळ हे प्रसिद्ध प्रार्थनास्थळ आहे. या भागातील बंदोबस्तास वाढ करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. ज्यु धर्मियांची प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

आणखी वाचा-कार्ला गडावर एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. या भागातील बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विविध विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी सुरक्षेचा आढावा घेतला असून, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict security in punes jewish place of worship pune print news rbk 25 mrj
Show comments