पिंपरी: जालना येथे झालेल्या मराठा समाजातील आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज बुधवारी माहिती व तंत्रज्ञाननगरी हिंजवडीत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
सकाळी सहा वाजल्यापासून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात अनेक महिला, पुरुष व लहान मुले जखमी झाली. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, समस्थ ग्रामस्थ हिंजवडी, हिंजवडी ग्रामपंचायत यांच्या वतीने बंदची हाक दिली आहे.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवावर विरजण? ‘हे’ आहे कारण
संपूर्ण हिंजवडी परिसरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिकांनी सकाळपासून सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. शांततेच्या मार्गाने बंद पाळण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद असणार आहे. वैद्यकीय सेवा चालू आहेत.
हेही वाचा… “आता नुसती आश्वासनं नकोत”, मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंचे विधान; म्हणाल्या, “आरक्षण कसे मिळणार हे..”
“मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येत आहे. शांततापूर्ण बंद सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना दुकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद पाळणार असल्याचे” श्यामराव हुलावळे यांनी सांगितले.