लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : वाघोलीत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

अजय विश्वनाथ पवळे (वय १६, रा. अनुसया पार्क, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वाघोलीतील अनुसया पार्कमधये पवळे कुटुंब राहायला आहे. अजय एका महाविद्यालयात अकरावीत होता. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना अजयने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजयची आई सायंकाळी कामावरुन परतल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

आणखी वाचा-दहशतवादी कारवायांचा डाव उधळल्याने पुणे पोलिसांचे कौतुक; राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुखांकडून पोलिसांना पत्र

या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अजयने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. लोणीकंद पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.