शिक्षणसंस्थांची उपलब्धता, दर्जा यामुळे शिक्षणात आघाडीवर असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रातच सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हेविषयक सांख्यिकी अहवालामधून राज्यातील विद्यार्थी   परीक्षेतील अपयश, महाविद्यालयीन स्पर्धेचा ताण आणि कौटुंबिक अडचणी यांना सामोरे जाताना अधिक प्रमाणात  मरणाला कवटाळत असल्याची बाब स्पष्ट झाली असून वर्षांगणिक त्यात झालेली वाढ  चिंतादायक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विविध राज्यांतील महाविद्यालये, वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना समोर येतात. आता देशात विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असल्याचे समोर आले आहे. २०१५ चा राष्ट्रीय गुन्हेविषयक सांख्यिकी अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार देशात आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी साडेतेरा टक्के विद्यार्थी  महाराष्ट्रातील आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये  आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संख्याआलेख चढता दिसत असून ही चिंता करण्याजोगी स्थिती आहे.

कारणे काय?

आत्महत्या करणारे बहुतेक विद्यार्थी हे १४ वर्षांपुढील आहेत. या आत्महत्यांमध्ये प्रेमप्रकरणातील नैराश्याचे कारण सर्वाधिक  असल्याचे अहवालातून दिसत आहे.पण  सोबत    परीक्षेतील अपयशाचे नैराश्य, महाविद्यालयातील ताण, कौटुंबिक समस्या ही देखील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागील कारणे आहेत.

‘नियम’ नसल्यामुळे महाविद्यालयांमध्ये समुपदेशनाची सुविधा नाही विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या ही  महाविद्यालयांसाठीही चिंतेची बाब ठरली आहे. मात्र, काही अपवाद वगळता बहुतेक महाविद्यालयांमध्ये अजूनही समुपदेशनाची सुविधा नाही. अभ्यास, स्पर्धा, नातेसंबंधांमधील तणाव अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे. महाविद्यालयांनी समुपदेशक नेमण्याबाबत शासनाने यापूर्वी सूचना दिल्या होत्या. विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही समुपदेशनाची सुविधा, विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष, विद्यार्थी आणि शिक्षकांची सामाईक समिती नेमण्याच्या सूचना महाविद्यालयांना केल्या जातात. मात्र, समुपदेशक नेमणे हा ‘नियम’ नसल्यामुळे काही अपवाद वगळता महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे.

आकडेवारी सांगते..

देशातील एकूण आत्महत्यांपैकी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांचे प्रमाण हे ६.७ टक्के आहे. गेल्या संपूर्ण वर्षांत (२०१५) देशात ८ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या . ही संख्या २०१४ मध्ये ८ हजार ६८ होती. देशातील सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या या २०१५ मध्ये राज्यात झाल्या असून १ हजार २३० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. २०१४ च्या तुलनेत आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असून या वर्षी १ हजार १९१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.